गावगाथा

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे व दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा पुण्यात सत्कार

लिंगायत भूषण २०२६’ पुरस्कारार्थींचाही होणार सन्मान; ३ सप्टेंबरला पुण्यात सोहळा

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे व दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा पुण्यात सत्कार
‘लिंगायत भूषण २०२६’ पुरस्कारार्थींचाही होणार सन्मान; ३ सप्टेंबरला पुण्यात सोहळा
अक्कलकोट, दि. 2 – लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्कार समारंभ सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले के.एल.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सोहळ्याचे आयोजन गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, बिबवेवाडी, पुणे येथे करण्यात आले आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन लिंगायत समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘लिंगायत भूषण २०२६’ पुरस्कारार्थींचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी मल्लिकार्जुन उमदी, विश्वनाथ महंताशेट्टर, शिवलिंग ढवळेश्वर, शंकरगौडा हादीमनी, दानशूर बसलिंगप्पा खेडगी (अक्कलकोट), शिवनगौड नंदेप्पागौडर, चंद्रशेखर डोळी, चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या सोहळ्याचे शुभहस्ते पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्र पवार (ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते होणार असून, ह.भ.प. सद्गुरू गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर (सह-अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) तसेच श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल सिक्कीम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट –
लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा सन्मान करणे ही गौरवाची बाब आहे. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button