श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य स्वामींच्या भक्ती प्रसाराला चालना देणारे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०१/०९/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने चालवण्यात येणारे धार्मिक व सामाजिक कार्य हे अत्यंत उल्लेखनीय असून स्वामींच्या भक्तीचा प्रसार सर्वदूर करण्याचे मोठे कार्य समिती करत आहे, म्हणून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य स्वामींच्या भक्ती प्रसाराला चालना देणारे कार्य आहे असे गौरवोद्गार
महाराष्ट्र शासन नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास या खात्यांचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काढले.
ते नुकतेच येथील श्री श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला सदिच्छा भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. यावेळी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी देवस्थान कार्यालयात
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र -आशीर्वाद, प्रसाद पत्र देऊन यथोचित सत्कार केला.
पुढे बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने भाविकांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था ठेवली आहे. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली समितीने स्वच्छता, सुरक्षा आणि भक्त निवासाच्या बाबतीत केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. येथे वर्षभरात व श्रावण मासानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे होणारे आयोजन म्हणजे अध्यात्म आणि धर्माचा वारसा जपणारे कार्य आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे हे कार्य भविष्यात त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी पण उत्तमरित्या सांभाळतील यात तिळमात्र शंका नाही. समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या स्वामी सेवेतून घडणाऱ्या या कार्यामुळेच आज देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोट नगरीकडे आकर्षित होत आहेत. हे कार्य म्हणजेही स्वामींच्या भक्ती प्रसाराला चालना देणारेच कार्य आहे असेही मनोगत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त करून मंदीर समितीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी,
पोलीस निरीक्षक अविनाश पवार, दत्ता ठेंगळे, सरपंच प्रदीप पाटील, सोलापूर आरटीओ विभाग तथा सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक निलेश देशमुख, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक अजित कदम, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक प्रदीप बिराजदार, मोटार वाहन निरीक्षक हेमंत खराबे, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक औदुंबर गवळी, आरटीओ सहाय्यक निरीक्षक नेहा कांबळे देवस्थानचे विश्वस्त मंडळ पदाधिकारी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, महेश मस्कले आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!