भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
भारतीय जनता पक्ष (भाजपा) अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. प्रिया भोसले आणि समीर पाटील यांच्यासह श्री क्षेत्र अक्कलकोट येथे भेट देऊन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. महेश इंगळे यांच्या हस्ते आचार्य तुषार भोसले, सौ. प्रिया भोसले व समीर पाटील यांचा स्वामी महाराजांची प्रतिमा, स्वामींचे कृपावस्त्र आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, “श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीत येऊन दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन देश, राज्य आणि संपूर्ण समाजाच्या समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली.”
या सत्कार प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे शिवशंकर स्वामी यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!