
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात जागतिक योग दिवस साजरा..

अक्कलकोट: महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय व मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिनानिमित्त शिक्षक व विद्यार्थी यांचा भव्य योग शिबीर घेण्यात आला.
प्रथम संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. योग शिक्षक चंद्रकांत बिराजदार यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम चे महत्व या विषयावर विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. तद्नंतर सेमी विभागातील प्रशिक्षीत विद्यार्थ्यानी स्टेजवर प्रात्यक्षिक करत असताना त्यांच्याबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राणायाम व योगाची सर्व आसने करत होते.
जागतिक योग दिन व वटपौर्णिमा निमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानी एक झाड लावले पाहिजे, असा संदेश देऊन विविध प्रकारचे सुमारे 250 झाडांच्या रोपांचे उपस्थित विद्यार्थ्याना व शिक्षकाना मोफत वाटप केले.
यावेळी मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाकडून वृक्षारोपण करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीईओ रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे,

मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप,प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेवानिवृत्त शिक्षक खंडेराव घाटगे, शिवानंद पुजारी आदी मराठी, कन्नड, सेमी विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.
