प्रामाणिक कार्यास यशाची सदैव साथ – महेश इंगळे
अक्कलकोटचे सुपुत्र प्रज्योत अचलेर यांना यंग प्रिमीसिंग पुरस्कार लाभल्या प्रित्यर्थ महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत.

प्रामाणिक कार्यास यशाची सदैव साथ – महेश इंगळे

अक्कलकोटचे सुपुत्र प्रज्योत अचलेर यांना यंग प्रिमीसिंग पुरस्कार लाभल्या प्रित्यर्थ महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत.

पुरस्कारा प्रित्यर्थ प्रज्योत अचलेर यांचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांनी केला सन्मान.

(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी) (दिनांक-१९/१/२५)
प्रामाणिकपणा व अथक परिश्रम ही उज्वल यशाची गुरुकिल्ली आहे. या माध्यमातूनच जीवनात मोठे यश प्राप्त करता येते. हेच ध्येय बाळगून आमचे मित्र प्राध्यापक शिवशरण अचलेर यांचे सुपुत्र प्रज्योत अचलेर यांनी येथील श्री.शारदामाता इंग्लिश मेडियम स्कूल व सी.बी.खेडगी शास्त्र महाविद्यालय तसेच कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे तंत्रनिकेतन आणि पुढील शिक्षण सोलापूर येथे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज येथे बी.टेक.पदविका प्राप्त केली आहे. त्यांचे वडील प्राध्यापक शिवशरण अचलेर हे अक्कलकोट येथील सी.बी. खेडगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मुळात शैक्षणिक वारसा अचलेर घराण्यात चालत आलेला असल्याने प्रज्योत यांचे शैक्षणिक परिश्रम व शिवशरण अचलेर यांचे मार्गदर्शन यांच्या संयुक्त वाटचालीने एक उच्चशिक्षित प्रज्योत अचलेर यांचा चेहरा आपल्यासमोर आता आहे. या अनुषंगाने समाजातील विद्यार्थ्यांना एवढे सांगावेसे वाटते की शैक्षणिक वाटचालीत प्रामाणिक कार्यास यशाची सदैव साथ असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. जगप्रसिद्ध रिलायन्स कंपनीत सिव्हील विभागात कार्यरत असलेले अक्कलकोटचे सुपुत्र प्रज्योत अचलेर असिस्टट मॅनेंजर यांना रिलायन्स कंपनीत संपतराव इपीसी सिव्हील विभाग मुख्यायल येथून पश्चिम महाराष्ट्र यंग प्रिमिसिंग आवार्ड पुरस्कार लाभल्याबद्दल नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन प्रज्योत अचलेर यांचा यथोचित सन्मान केला. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, चित्तरंजन अगरथडे, यांनी उपस्थित राहून प्रज्योत अचलेर यांचे अभिनंदन केले.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रज्योत अचलेर यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर
व अन्य दिसत आहेत.
