गावगाथा

अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांच्या वतीने मुस्लिम प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024

हंगाम 3. ही क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर 2 ते 4 या कालावधीत खेळवली जाणार

अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांच्या वतीने
मुस्लिम प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 हंगाम 3. ही क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर 2 ते 4 या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेकरिता खेळाडू लिलाव प्रकिया नुकतेच जि. प.शाळा बोरगाव येथे अगदी थाटामाटात व उत्साही वातावरणात CKL youtube live chanel वर पार पडली.सदर स्पर्धेत एकूण 6 संघांनी भाग घेतला.

नूर 11. संघमालक समीर मकानदार, कर्णधार राजू बागलकोटे.

शाहिद 11. संघमालक जीलानी निरगुडे,कर्णधार रुकमोद्दीन पिरजादे.

हुसेन 11. संघमालक सैपन दिवटे,कर्णधार आमीन बावसे.

उमर 11. संघमालक उमर पठाण,कर्णधार बाबा शेख.

सी जी बॉईज. संघमालक फरहान कोरबू, कर्णधार मलीक मत्तेखान.

पठाण नाईट रायडर संघमालक सैपन पठाण,कर्णधार ताजुद्दीन शेख.
वरील 6 संघाची संघबांधणी Ipl प्रमाणे लिलाव पद्धतीने तयार करण्यात आली.
एकूण 108 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्येकी 16 खळाडूंचा चमू तयार करण्यात आला. लिलावात एकूण 96 खेळाडू संघमालकांच्या पसंतीस पडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख पाहुणे बोरगावचे गुरुप्रसाद कन्स्ट्रक्शनचे मालक भूतपूर्व क्रिकेट खेळाडू बसवराज कल्याणी यांचे सत्कार झाले. तद्नंतर सर्व संघमालक व कर्णधार यांचेसुद्धा स्वागत झाले. जर्सी अनावरण, व सर्व कर्णधार यांच्या हस्ते Mpl चषक अनावरण पार पाडले.
या स्पर्धेचे स्पर्धा समिती अध्यक्ष जीलानी निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली ही लिलाव प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष श्री निरगुडे आपल्या प्रास्ताविक मनोगतात स्पर्धेचे उद्धिष्ट मांडले ते म्हणाले ” ही स्पर्धा अशा खेळाडू साठी आहे जे प्रतिभावान असूनसुध्दा त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही. आणि ते दुर्दैवाने ते पुढे येऊ शकत नाहीत,अशा दुर्लक्षित खेळाडूना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सर्वानी प्रामाणिकपणे आपला खेळ करावा” असे आवाहन केले.
समिती सदस्य राजू बागलकोटे यांनी आपल्या मनोगतात मोबाईल मुळे खेळाडू मैदानकडे पाठ दाखवत आहेत ही चिंतनीय बाब अधोरेखित केली.लोकप्रिय बिनीचे फलंदाज बाबा शेख यांनी आपल्या छोटेखानी मुलाखतीत सर्व खेळाडूना चांगले खेळ करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडू लिलाव प्रक्रिये मध्ये सर्वाधिक महागडे खेळाडू म्हणून महिबूब शेख राहणार
बादोले याना पसंती मिळाली.
या कार्यक्रमासाठी क्रिकेटप्रिय व्यक्तिमत्त्व श्री रफिक तांबोळी, सोलापूरचे सैपन शेख व बोरगावचे हाफिज आबीद साहब यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.या Player Auction कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक जकीउल्ला हिप्परगे यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रम youtube वर प्रसारित केल्यामुळे हजारो लोकांनी पाहून खूप कौतुक केले. ही स्पर्धा येत्या नोव्हेंबर 2,3,4,5 तारखेला दे. बोरगाव येथे पार पडेल व या स्पर्धेत उद्योजक श्री जावेद बागवान मुंबई श्री समीर मकानदार अक्कलकोट व sp कन्स्ट्रक्शन चे मालक श्री अब्दुल मकानदार बोरगाव अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा अशी प्रोत्साहनपर बक्षिसे दिली आहेत.
अशी माहिती स्पर्धा समिती सदस्य बाबा शेख,आमीन बावशे,सैपन दिवटे,उमर पठाण,महिबूब सातलगाव व ईशराक बागवान यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी बोरगावचे जकीउल्ला हिप्परगे यांनी सर्व सहभागी मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button