मायबोली मराठीचा आभिमान बाळगलाच पाहिजे — रेखा सोनकवडे
खैराट ( प्रतिनिधी ) जि.प.प्राथमिक शाळा खैराट ता .अक्कलकोट शाळेत या वि .वा .शिरवाडकर जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळूसिंग राजपुत होते तर कुसुमाग्रज यांच्या फोटोचे पूजन फिरोजा नदाफ यांनी केले . “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ” “बोलावे शुध्द ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध मराठीचे हेच रूप अनमोल “मराठीचा आभिमान घराघरात मराठी सन्मान ” महाराष्ट्राचे थोर लेखक विचारवंत कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्क्रुतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले .मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कवी समीक्षक म्हणून अनमोल कार्य केले .मराठी भाषा ही भारताच्या 22 अधीक्रुत भाषापैकी एक आहे .मराठी महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे ती प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि तिचा आभिमान बाळगला गेलाच पाहिजे .आपल्या मातृभाषेचा मान ठेऊन तिच भाषा सगळीकडे प्राधान्याने वापरा असे रेखा सोनकवडे माहिती देताना म्हणाल्या .आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यिक निर्माण झालेले आहेत .मराठी भाषा गौरव दिन हा मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे .महाराष्ट्राच्या सम्रूद्ध सांस्क्रुतिक वारशाच्या जतनासाठी मराठी भाषेचा वापर अत्यंत महत्वाचा आहे .भाषेचा वापर इतरांना माहिती देण्यासाठी गोष्टी सांगण्यासाठी भावना मनस्थिती कल्पना माहिती अनुभव इत्यादी व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर केला जातो .आपल्या मराठी भाषेचा गौरव सगळ्यांनी केला पाहिजे जगण्याची कला शिकवणारी मराठी भाषा शिकवा टिकवा आणि मराठी भाषा स्म्रुद्ध करा असेही रेखा सोनकवडे म्हणाल्या .बाळूसिंग राजपुत यांनी मराठी भाषा गौरव दिन व वि .वा .शिरवाडकर यांच्या विषयी माहिती सांगितली .मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करा भाषेचा सांस्क्रुतिक वारसा जपा असे मार्गदर्शन करताना सांगितले .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!