भुरीकवठे येथे कै. सुभाष धनाप्पा खुने गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश वाटप
भुरीकवठे — येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व कन्या शाळेत कै. सुभाष धनाप्पा खुने गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेशाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कै. सुभाष धनाप्पा खुने गुरुजी यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खुने परिवाराच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश देण्यात आला. शिक्षणासोबतच क्रीडेला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला उपसरपंच श्रीमंत कुंटोजी, उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, गोगावचे मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे तसेच सर्व खुने परिवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. खुने गुरुजी यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. समाजातील दानशूर वृत्तीमुळेच ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाच्या वतीने खुने परिवारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून “खुने परिवारांचे खूप खूप आभार, धन्यवाद!” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय चव्हाण यांनी केले व आभार कांचन बिराजदार यांनी मानले व श्रीमती बडूरे, शेख यांचे सहकार्य लाभले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!