गावगाथा

हाजी फारुक मकबूल शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त मैंदर्गीत मोफत शासकीय दाखला शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाढदिवस विशेष

हाजी फारुक मकबूल शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त मैंदर्गीत मोफत शासकीय दाखला शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट तालुक्यातील गोरगरिबांचे कैवारी व सामाजिक कार्यकर्ते हाजी फारुक मकबूल शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त मैंदर्गी येथे विविध शासकीय योजनांबाबत मोफत दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मैंदर्गी (ता. अक्कलकोट तालुका**) येथील शाब्दी ग्रुपच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जात दाखले, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, ओबीसी समाजाचे विविध दाखले, मतदान ओळखपत्र तसेच अपंग प्रमाणपत्र आदी शासकीय कागदपत्रांची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिराचे मार्गदर्शन जैनोदिन अश्ररफी सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमास शाब्दी स्थानिक गटाचे नगरसेवक विठ्ठल आरेनवरू, मुनाफ चिरके, फिरोज पठाण, आकाश अरेनवरू, नुर रुस्तुम, आरिफ रुस्तुम, मस्तान बेपारी, महेबुब मकानदार, आझम शेखजी तसेच शाब्दी ग्रुपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मैंदर्गी गावकऱ्यांनी शिबिरास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले. हाजी फारुक मकबूल शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button