गावगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

दिनविशेष

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    
वागदरी (ता. अक्कलकोट) — जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वागदरी येथे मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्यातील थोर साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक श्री. महालिंगराया हरकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील कृतिशील शिक्षक श्री. पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो, तो कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कसा सुरू झाला, तसेच मायबोली मराठीच्या जतन व संवर्धनासाठी आपण सर्वांनी कोणती भूमिका घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कुसुमाग्रज यांच्या समृद्ध साहित्यसंपदेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यानंतर श्री. भास्कर सर यांनीही मराठी भाषा दिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती शिंदे हे होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. कलशेट्टी मॅडम, मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, श्री. बागवान सर, श्री. मुरटे सर, श्री. पाटील सर, श्री. भास्कर सर, सौ. गिरी मॅडम, सौ. फड मॅडम तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. भास्कर सर यांनी मानले. अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वागदरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button