गावगाथा

अकलूज नाही आता अक्कलकोट’ सत्तेचे कनेक्शन ; गोरे अन् कल्याणशेट्टींच…..

राजकीय बातमी

अकलूज नाही आता अक्कलकोट’ सत्तेचे कनेक्शन ; गोरे अन् कल्याणशेट्टींच…..
सोलापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी निवडी लवकरच होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून केवळ तारीख काढणे बाकी आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा दिसून आला.
महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीने एक हाती वर्चस्व मिळवले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे या विजयाचे किंग मेकर ठरले आहे. याचबरोबर आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सुद्धा जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी नूतन जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळाली अजूनही त्यांच्या नावाची चर्चा होत आहे परंतु त्यांनी नकार दिल्याचे समजते.
भविष्यात सचिन दादांना मिळणारे मंत्रिपद अध्यक्षपदामुळे जाईल असेही या निमित्त बोलले जात आहे. अध्यक्ष पदापेक्षा सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद महत्त्वाचे आहे.
काही का असेना जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत अक्कलकोट केंद्रस्थानी राहणार हे मात्र नक्की आहे. पूर्वी जिल्ह्यावर मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते. जिल्हा परिषदेत ते सांगेल ते पदाधिकारी व्हायचे त्यावेळी अकलूज केंद्रबिंदू होता पण आता अकलूज नाही तर अक्कलकोट जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी ही दोन नेते ठरवतील तेच होणार ही काळा दगडावरची रेष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोरे, कल्याणशेट्टी यांना मिळणारच सपोर्ट हा बरेच काही सांगून जातो.
शांभवी कल्याणशेट्टी यांनी अध्यक्षपदासाठी नकार दिल्यानंतर आता सांगोल्याचे भाजपचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, होटगीचे रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. पण अध्यक्ष पद बार्शी, सांगोला, माढा, पंढरपूर, करमाळा यापैकी कोणत्या तालुक्याकडे जाईल याची उत्सुकता सर्वाधिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button