गावगाथा

रमजान ईद निमित्त सहा वर्षीय तैमुर इम्रान शेखचा एक दिवसाचा रोजा; सर्वत्र कौतुक

रमजान स्पेशल

रमजान ईद निमित्त सहा वर्षीय तैमुर इम्रान शेखचा एक दिवसाचा रोजा; सर्वत्र कौतुक
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*पवित्र रमजान महिन्यात उपवास, संयम आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर रमजान ईदचे औचित्य साधत अक्कलकोट येथील सहा वर्षीय तैमुर इम्रान शेख या चिमुकल्याने एक दिवसाचा रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
लहान वयातच धार्मिक संस्कारांची जाणीव ठेवत तैमुरने पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास पाळला. कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नमाज अदा केली तसेच संयम, शिस्त आणि श्रद्धेचे महत्त्व जपले. दिवसभर कोणतीही तक्रार न करता त्याने रोजा पूर्ण केल्याने वटवृक्ष देवस्थान संचलित विठ्ठल उपलब बाल संस्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे, कृपा सिंधू फाउंडेशनचे सचिव रवीकिरण पाटील, फैजअहमद कोरबू , मुजमीन शेख, इस्माईल मुकादम, नगरसेवक सचिन शिंदे, समाजसेवक गोविंद शिंदे, आदीसह परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले.
रोजा सोडताना कुटुंबीयांनी त्याचा छोटेखानी सत्कार करून प्रोत्साहन दिले. एवढ्या लहान वयात दाखवलेली चिकाटी आणि श्रद्धा ही इतर मुलांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. रमजान ईद हा आनंद, बंधुता आणि त्यागाचा संदेश देणारा सण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button