ग्रामीण घडामोडी

*” उत्तुंग यशासाठी नम्रता व सहनशीलता आवश्यक …* – *प्रा. शिवकर्णी पार्टील *

श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ येथे श्री गणेश उत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प व्याख्याते प्रा. शिवकर्णी पाटील, स

*” उत्तुंग यशासाठी नम्रता व सहनशीलता आवश्यक …* – *प्रा. शिवकर्णी पार्टील **

श्री क्षेत्र ता द. सोलापूर
दि. २५ श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ येथे श्री गणेश उत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प व्याख्याते प्रा. शिवकर्णी पाटील, समाज सेविका सारिका सोनवले प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार सर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष श्री रामचंद्र दसले, युवा उद्योजक श्री गणेश दंतकाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीची पूजा संपन्न झाली.तदनंतर सारिका सोनवले यांनी मानसिक आरोग्य या विषयावर सविस्तर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य सुस्थितीत असणे खूप महत्वाच आहे. या करीता नियमित व्यायाम, योग्य आहाराची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
प्रा. शिवकर्णी पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की,माणूस कितीही मोठा असला तरी जमिनीची नाळ सदैव जोडली असली पाहिजे.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. असे कार्य बिराजदार सरांची असल्याची भावना व्यक्त केली .करिअर गायडन्समुळे विद्यार्थी योग्य मार्गाने पुढे जातील. ग्रामीण विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे.प्रत्येकाकडे काहीतरी चांगले गुण असतात ते चांगले गुण एखाद्या चातकाप्रमाणे विद्यार्थ्यानी आत्मसात करावे. बदल हा निसर्गाचा नियम आहे.बदलत्या वातावरणाशी जुळवून विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभाग घेतले पाहिजे. अशी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. युवा उद्योजक श्री गणेश दंतकाळे यांना वसतिगृहातील गोर गरीब विद्यार्थ्याना मोठे १२ डजन टॉवेल व प्रसाद म्हणून केळी वाटप केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीत वेगळेपण असते, वेगळेपण सिद्ध करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करून समाजामध्ये वेगळेपणाचे कर्त्रुत्व सिद्ध केले पाहिजे. असा सल्ला दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पट्टणशेट्टी तर आभार प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी मानले.यावेळी शिक्षकवृन्द् ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button