गावगाथा

कर्तव्य फाऊंडेशनतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; सिद्धार्थ ग्रंथालयास पुस्तक भेट व मान्यवरांचा सन्मान

दिनविशेष

कर्तव्य फाऊंडेशनतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; सिद्धार्थ ग्रंथालयास पुस्तक भेट व मान्यवरांचा सन्मान
पुणे — कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन, कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) जयंती तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त सिद्धार्थ ग्रंथालयास स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचे संच भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिच्या जतनासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी प्रतिपादन केले. कुसुमाग्रज यांच्या साहित्य कार्याचा आढावा घेत त्यांच्या कवितांमधील सामाजिक भान आणि विचारप्रवर्तक लेखन यांचा गौरव करण्यात आला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांची व समाजजीवनातील प्रभावी भूमिकेची आठवण करून देण्यात आली.

या कार्यक्रमात पत्रकार संदीप कद्रे, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, प्राचार्य मनीष खंडागळे, ग्रंथपाल दिलीप निगडे, समाजसेवा अधिक्षक डॉ. शंकर मुगावे, पॉवरलिफ्टर शाम साहनी, बालरोग तज्ञ डॉ. सुधाकर शेट्टी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, बापूसाहेब गानला, भिमराव पाटोळे, प्रा. विलास आढाव, अशोक मेहेंदळे, मोहन दुधाणे, राज राणे, आयोजक विकास भांबुरे, अशोक देशमुख, दिलीप भिकुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे मराठी भाषा संवर्धनासोबतच सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button