श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न.
महेश मालक इंगळे यांच्या आयोजनात आयोजित मोफत शिबिराचा ६२ रुग्णांनी घेतला लाभ.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०१/०३/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या आयोजनातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच पार पडले. देवस्थान संचलीत श्री.स्वामी समर्थ रुग्णालय आणि सांगली येथील नंदादीप मेडीकल केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किणीचे डॉ.जगदीश तुळजापूरकर व डॉ.राजेश मलंग यांच्या सेवेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित मैंदर्गी रोड वरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न झाले या शिबीराचे उद्घाटन चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी या शिबिरात मोफत रक्त तपासणी, मोफत औषधे यासह एकूण ६२ रुग्ण सहभागी होवून लाभ घेतला आहे. त्यापैकी काही रूग्णांना सांगली येथील जीवनदीप नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविले आहे असे सांगून तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतल्याबद्दल गरजू रुग्णांचे आभार मानले. मंदीर समितीचे व श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संबंधीत वैद्यकीय स्टाफच्या उपस्थितीत शिबीराच्या प्रारंभी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून या शिबीराचे शुभारंभ करण्यात आले. सदरहू शिबीर यशस्वी होण्याकरीता मनोज काटगांव, सुनील पवार, अंकुश केत, राजू एकबोटे, हुंडेकरी सर, रमेश शिंदे सर,
रवि मलवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ – श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, डॉ.राजेश मलंग, मनोज काटगांव व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!