आई प्रतिष्ठानकडून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशूराम महाराज यांच्या जीवनावर आधारित संक्षिप्त डिजिटल ई-बुकचे प्रकाशन..
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते या ई-बुक्स चे अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व दैनिकांचे मान्यवर पत्रकार उपस्थित होते

*आई प्रतिष्ठानकडून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशूराम महाराज यांच्या जीवनावर आधारित संक्षिप्त डिजिटल ई-बुकचे प्रकाशन..*
*आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था नेहमीच सोलापूरमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे. ज्यामध्ये सर्वधर्मीय वंदनीय संतांच्या धर्मगुरुंच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यासाठी मूर्त्यांचे आणि माहितीपुस्तकाचे वाटप, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, महाप्रसाद वाटप ई. कार्याचा समावेश आहे.*
*आज दि.२१ एप्रिल २०२३ रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशूराम महाराज जयंतीच्या निमित्ताने यांच्या विचारांची आणि समाजाला दिलेल्या शिकवणीची सर्वांना माहिती व्हावी या हेतूने आई प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रकाश (भाऊ) नामदेवराव राठोड, लिंगायत समन्वय समितीचे श्री.विजयकुमार हत्तुरे सर आणि समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र राज्यचे श्री.काकासाहेब कुलकर्णी यांच्या सहकार्याने डिजिटल ई-बुकची संकल्पना साकार करण्यात आली आहे.*
*या डिजिटल ई-बुकचा लोकापर्ण सोहळा आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते या ई-बुक्स चे अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व दैनिकांचे मान्यवर पत्रकार उपस्थित होते.*
*आजकालच्या मोबाईलच्या युगात सोशल मिडीयाचा वापर अशा थोर महात्म्यांच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डिजिटल ई बुक हे अतिशय समर्पक माध्यम आहे. खासकरून युवा वर्ग ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांना आपल्या इतिहासातील थोर व्यक्तींच्या विचारांची गरज आहे त्यांच्यासाठी असे डिजिटल ई-बुक्स् उपयुक्त ठरणार आहेत. आई प्रतिष्ठानच्या फेसबुक पेज आणि इतर सोशल मिडियावरून महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशूराम महाराज यांच्या जयंतीदिनी हे ई-बुक्स डाऊनलोड करता येतील.*
