
अनंत चैतन्य प्रशालेत “गुरुपौर्णिमा ” उत्साहात साजरा–
—————————————-
अक्कलकोट : आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जाणारा, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या आपल्या गुरूंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे “गुरुपौर्णिमा” आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे अत्यंत उत्साहाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे यांच्या हस्ते अक्कलकोट नगरीचे अधिपती सद्गुरू श्री. स्वामी समर्थ व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या विद्यार्थिनी कु. सोनाली तळवार, दीपाली रोट्टे , शिवानी बाळशंकर, सरिता रोट्टे, अंकिता किरनाळीकर यांनी अतिशय सुंदर अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी “गुरुंचे आपल्या जीवनातील स्थान” याविषयी माहिती विषद केली, तर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे यांनीही विद्यार्थ्यांना गोष्टीरूपाने गुरुकुल पद्धतीपासून चालत आलेली “गुरू- शिष्य परंपरा व महत्व ” या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सहाय्यिका सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी केले तर आभार सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे यांनी मानले.
