गुरवार पोर्णिमा व सलग सुट्ट्यांनमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी तब्बल सुमारे ३ लाखांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले.,अनेक अडचणी सोयी सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी…
*अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम..!!*:

गुरवार पोर्णिमा व सलग सुट्ट्यांनमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी तब्बल सुमारे ३ लाखांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले.,अनेक अडचणी सोयी सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी…



*अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम..!!*:


*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*गुरवार पोर्णिमा व सलग सुट्ट्यांनमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दि.२३ मे रोजी सुमारे ३ लाखांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. सतत वाढत चाललेल्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागले. येणाऱ्या भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी प्रशासनाने पाऊले उचलण्याची मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.*
सलग आलेल्या सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविकांची संख्या सतत वाढत आहे. भाविकांना दर्शनासाठी चार ते सहा तास लागत होते. वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे गर्दी झाली होती.
दरम्यान पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. त्यामुळे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडली.
अक्कलकोट शहरात सर्वत्र रस्त्याच्या कडेला भाविकांची वाहनेच वाहन दिसत होती. गर्दीमुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे यात्रीनिवास, यात्रीभवन व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देव्बास्थान समितीचे भक्तनिवास आणि शहरातील शिवपुरी लॉज फुल्ल होते. मग एका भक्तनिवासातून दुसऱ्या भक्तनिवासाकडे, तेथून खासगी हॉटेल, लॉज करत घरगुती निवासाकडे भाविक वळत आहेत. यातूनच मग वेळ बघून भाविकांना अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहे.
*⭕चौकट :*
*अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम..!!*:
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सकाळीची अन्नदानाची वेळ पाच वाजेपर्यंत वाढविली आहे व रात्रीची अन्नदानाची वेळ बारा वाजे पर्यंत केले आहे. फक्त सायंकाळी पाच ते रात्री आठ हे तीन तास सोडता सकाळी ११ वाजल्यापासुन रात्री १२ वाजेपर्यंत अन्नदान सेवा केले जात आहे. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी अन्नछत्र मंडळ प्रयत्नशील आहे. अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम झाला असून, राज्यातील अन्य श्रीक्षेत्रातील महाप्रसादालयात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे भक्तांना सेवा देण्यामध्ये अव्वल ठरले आहे.
*⭕चौकट :*
अन्नछत्र या न्यासाने राज्य परिवहन मंडळाच्या चालक-वाहक आणि खासगी वाहनांच्या चालकांसाठी अद्यावत विश्रांती कक्ष असून, रा.प.म. व खासगीच्या दररोज शेकडो वाहने येतात. याबरोबरच नुकतीच न्यासाने घेतलेल्या जागेवर अद्यावत इतर वाहनाकरिता वाहनतळाची देखील व्यवस्था केलेली आहे. तीर्थक्षेत्र विकासाला बहुमोल मदत देखील न्यासाकडून होत आहे. नेहमीच न्यास स्वामी भक्तांना सोयी-सुविधा देण्याकामी अग्रेसर आहे. तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.