गळोरगी ग्रामस्थांचा माणुसकीचा आदर्श — संजवाड येथील पुरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात
अक्कलकोट प्रतिनिधी
ता. अक्कलकोट (मौजे गळोरगी):
माणुसकीचा आणि शेजारधर्माचा उत्तम नमुना घालून देत गळोरगी गावातील ग्रामस्थांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील पुरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
संपूर्ण गळोरगी ग्रामस्थांनी एकत्र येत संजवाड येथील २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १,००० रुपये प्रमाणे आर्थिक मदत पुरवली. मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पूरामुळे संजवाड गाव पाण्याखाली गेले होते. गावाला अक्षरशः पाण्याने वेढा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर गळोरगी ग्रामस्थांनी दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू असताना, गळोरगीकरांनी शेतकऱ्यांच्या हातात थेट आर्थिक मदत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडवले. या उपक्रमामुळे अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र गळोरगी गावाच्या या मदतीचे कौतुक होत आहे.
“एकमेंकांस सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” ही म्हण गळोरगी ग्रामस्थांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. या मदतीसाठी गावातील तसेच पुणे, सोलापूर येथे नोकरी करणाऱ्या गळोरगीकरांनीही हातभार लावला.
या कार्यात श्री प्रकाश बिराजदार, श्री नागप्पा बिराजदार, वे धानय्या स्वामी, प्रा. लक्ष्मीपुत्र मैंदर्गी, श्री धर्मराज बिराजदार, श्री शिवशरण आळगी, श्री संतोष प्रचंडे, श्री रामेश्वर बिराजदार, श्री योगेश हुणचे, श्री महेश बिराजदार, श्री मलकण्णा संगापुरे, श्री देगाव सर, श्री धोंडप्पा सुतार, श्री कौशल पिरगळ, श्री श्रीशरण पाटील, श्री ईरेश आजुरे, श्री शिवानंद बिराजदार, श्री सतिश बणजगोळ, श्री शिवानंद मैंदर्गीकर, श्री चेतन निरोणे, श्री नरेश निरोणे, श्री शांतप्पा बणजगोळ, श्री सिध्दाराम बणजगोळ, श्री प्रविण अंदोडगी, श्री विकास आळगी, श्री मुक्तेश्वर दुलंगे आणि समस्त गळोरगी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर मदत संजवाड ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम श्री राजशेखर अंदोडगी, श्री सिध्देश्वर बिराजदार, श्री गुरुलिंग प्रचंडे, श्री सिध्दाराम प्रचंडे आणि श्री प्रेम अंदोडगी यांनी केले.
योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचावी या हेतूने संजवाड येथील प्रगतशील शेतकरी श्री रामचंद्र बिराजदार आणि श्री संतोष बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
गळोरगी ग्रामस्थांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना केली की, या आपत्तीच्या काळातून सर्व शेतकरी बांधव लवकर सावरावेत आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा समृद्धी नांदो.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!