गावगाथा
संकटातही मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा वागदरी कट्टा — पूरग्रस्तांसाठी वागदरीकरांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
सामाजिक बांधिलकी

संकटातही मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा वागदरी कट्टा — पूरग्रस्तांसाठी वागदरीकरांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
अक्कलकोट तालुका —
“सामाजिक बांधिलकी ही केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून दिसली पाहिजे!” — हे वाक्य अक्षरशः साकारत वागदरी ग्रामस्थांनी व “वागदरी कट्टा” या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूरस्थितीमुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या संकटसमयी “वागदरी कट्टा” ग्रुपने मदतीचा हात पुढे करत आपुलकीचा सुंदर संदेश दिला. ग्रुपच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गावकऱ्यांनी मिळून तब्बल एक लाख बेचाळीस हजार रुपये जमा केले. या निधीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून अक्कलकोट तहसीलदार कार्यालयात सूपूर्द करण्यात आले.
या वेळी तहसीलदार मगर साहेब यांच्या हस्ते किट स्वीकृत करण्यात आले. त्यांनी वागदरीकरांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत म्हटले,
“वागदरी कट्टा ग्रुपचा हा आदर्श उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. संकटसमयी एकत्र येणे हीच खरी ताकद आहे.”