तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान – शांभवी कल्याणशेट्टी
शांभवी कल्याणशेट्टी यांची कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयास भेट.

तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान – शांभवी कल्याणशेट्टी

शांभवी कल्याणशेट्टी यांची कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयास भेट.

शांभवी कल्याणशेट्टी यांनी कै.कल्याणराव इंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयचे शैक्षणिक धोरण व उपक्रमास नेहमीच सहकार्य करण्याचे
दिले आश्वासन.

(श्रीशैल गवंडी, दिनांक – ३०/०१/२०२५)
अक्कलकोट – कल्याणशेट्टी परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात मोठे योगदान आहे. याप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचेही तालुक्यातील तंत्र निकेतन शिक्षण प्रणालीत मोठे योगदान आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने येथील कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात अनेक गरजू विद्यार्थ्यांना
तंत्र शिक्षणाची सोय तालुक्यातच मिळत असल्याने तंत्र शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांची मोठी सोय झालेली आहे. आज सोलापूर पुणे, मुंबईच्या धरतीवरील तंत्र शिक्षण इंगळे परिवार यांच्यामुळे अक्कलकोट मध्ये उपलब्ध आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने व महेश इंगळे यांच्या सेवाभावी वृत्तीने हे तंत्रनिकेतन महाविद्यालय यशस्वीपणे विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत आहे, त्यामुळे अक्कलकोट सारख्या ग्रामीण परिसरातील कानाकोपऱ्यात तंत्रनिकेतन महाविद्यालयाची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रशिक्षण पोहोचविण्याबाबत कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले. ते येथील कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित सोलापूर जिल्हा चौदावे वार्षिक गणित अधिवेशन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयातील कै.कल्याणराव इंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शांभवी
कल्याणशेट्टी बोलत होत्या. पुढे बोलताना शांभवी कल्याणशेट्टी यांनी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शैक्षणिक धोरणांना व उपक्रमांना स्वामी समर्थांची सेवा या उदात्त हेतूने नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे मनोगत ही व्यक्त केले. यावेळी शांभवी कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे, जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी स्वाती हवेले, शिक्षण उपनिरीक्षक श्वेता नडीमेटेल, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष कलप्पा बुळळा, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजयकुमार पवार, गणित आध्यापक तथा संगीत अलंकार मनोहर देगावकर, प्रा.शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीशैल गवंडी, उमेश सोनवणे, सचिन घाटगे, प्रसाद पाटील आदींसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कै कल्याणराव इंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शांभवी कल्याणशेट्टी, उपशिक्षण अधिकारी स्वाती हवेले, शिक्षण उपनिरीक्षक श्वेता नडीमेटेल, कलप्पा बुळळा, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजयकुमार पवार, गणित आध्यापक तथा संगीत अलंकार मनोहर देगावकर, प्रा.शिवशरण अचलेर इत्यादी दिसत आहेत.