गावगाथा

श्री.वटवृक्ष मंदीर समिती व महेश इंगळेंचे कार्य गौरवास्पद – अभिजीत पवार

अभिजीत पवार यांचा सपत्निक वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री.वटवृक्ष मंदीर समिती व महेश इंगळेंचे कार्य गौरवास्पद – अभिजीत पवार

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, )
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व महेश इंगळे यांचे धार्मिक कार्य गौरवास्पद असल्याचे मनोगत सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व संपादक अभिजीत पवार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिजीत पवार यांचा श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी अभिजीत पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दत्त सांप्रदाय मधील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे. देवस्थान मुळे अक्कलकोट शहराचा भविष्यात कायापालट होईल. स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन असलेली ही नगरी आहे. अशा धार्मिक ठिकाणी सेवा करणे हे इंगळे यांचे परमभाग्य आहे. महेश इंगळे यांनी ही सेवा, समर्पण जीवनशैली जोपासून देव देवस्थानचा आध्यात्मिक वारसा पुढे चालविला आहे म्हणून श्री वटवृक्ष मंदिर समिती व महेश इंगळे यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे मनोगत ही अभिजीत पवार यांनी व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे प्रमुख युवा कार्यकारी नेतृत्व प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सकाळ तालुका प्रतिनिधी चेतन जाधव, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, स्वामीलिंग कांबळे, दर्शन घाटगे इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – अभिजीत पवार यांचा सपत्निक वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button