शिवपुरी येथील जागतिक दर्जाच्या अग्नि मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास जन्मेंजयराजे भोसले महाराज व महेश इंगळे यांच्या शुभेच्छा.
भूमीपूजन प्रसंगी जन्मेंजयराजे भोसले महाराज व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व कुटुंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन करण्यात आला सन्मान.

शिवपुरी येथील जागतिक दर्जाच्या अग्नि मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास जन्मेंजयराजे भोसले महाराज व महेश इंगळे यांच्या शुभेच्छा.

भूमीपूजन प्रसंगी जन्मेंजयराजे भोसले महाराज व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व कुटुंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन करण्यात आला सन्मान.

(अक्कलकोट, दिनांक – १२/०३/२०२५) आज जागतिक अग्निहोत्र दिनाच्या शुभमुहूर्तावर येथील शिवपुरीस्थित विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या व जागतिक दर्जाचा असलेला नियोजीत जगातील सर्वात मोठा अग्नि मंदिर भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. याप्रसंगी श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात व श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे यांच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले व कुटुंबीयांचा सत्कार श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले महाराज व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जन्मेंजयराजे भोसले महाराज यांनी येथील विश्व फाऊंडेशनचे कार्य डॉ.पुरुषोत्तम
राजीमवाले यांच्या माध्यमातून तथा संकल्पनेतून सुरू असलेले अध्यात्म, आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचे कार्य भौगोलिक दृष्ट्या नेहमीच हितावह असल्याचे मनोगत व्यक्त करून या अग्नी मंदिर निर्मिती कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मा.नगरसेवक महेश हिंडोळे, लाला राठोड, बाळासाहेब कुलकर्णी, अप्पू पुजारी, अभय खोबरे, शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, नितीन शिंदे, नवनाथ काळे, प्रसाद पाटील आदीसह नागरीक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले व कुटुंबीयांचा सत्कार करताना जन्मेंजयराजे भोसले महाराज, प्रथमेश इंगळे, महेश हिंडोळे, अभय खोबरे व अन्य दिसत आहेत.
