
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
२५०, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार खंडू इंगळे यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बनसोडे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रारंभी अक्कलकोट शहरातील भीम नगर येथून भव्य अशी वाजत गाजत रॅली काढण्यात आली. अक्कलकोट शहरातील राजे फत्तेसिंह चौक , मेन रोड कारंजा चौक , विजय कामगार चौक ते बस स्थानक मार्गे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीचा समारोप बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन देवस्थान परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाजवळ करण्यात आला. या रॅलीमध्ये चंद्रशेखर मडीखांबे ,ज्योतिर्लिंग स्वामी शीलामणी बनसोडे , रविराज पोटे , सिद्धार्थ बनसोडे विशाल ठोंबरे ,संदीप बाळशंकर , गौतम गायकवाड , नागेश हरवळकर , माणिक गायकवाड , बबन गायकवाड , यशवंत इंगळे , राजू इंगळे ,राजू वाघमारे कृष्णा इंगळे गोविंद इंगळे सुभाष इंगळे , गंगाराम वाघमारे , संतोष बाळशंकर ,अमृत सोनकांबळे , हनुमंत जाधव , सतीश बनसोडे , महादेव थोरे ,शेखर सोनकांबळे , तुकाराम साखरे ,प्रकाश शिंदे ,खाजाप्पा आयवळे , शिवाजी चौगुले , संजय इंगळे , विजय भालेराव , गंगाराम गायकवाड , श्याम बनसोडे ,शंकर शिंदे ,बाबुराव गायकवाड , चंदू शिंगे ,संजय शिंदे , अजय गंगावणे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
