गावगाथा

मध्यवर्ती शिवजयंतीचे तरुणांना एकसंघ ठेवण्याचे कार्य कौतुकास्पद – प्रथमेश इंगळे

मध्यवर्ती शिवजयंती उत्सवात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते शिवरायांची आरती संपन्न.

मध्यवर्ती शिवजयंतीचे तरुणांना एकसंघ ठेवण्याचे कार्य कौतुकास्पद – प्रथमेश इंगळे
मध्यवर्ती शिवजयंती उत्सवात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते शिवरायांची आरती संपन्न.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.१९/०२/२६)
राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांच्या नेतृत्वात साजरा होणारा मध्यवर्ती शिवजयंती सोहळा हा शहराची शान आहे. या माध्यमातून शहरातील सर्व जाती धर्माचे लोक व तरुण एकवटतात, त्यामुळे मध्यवर्ती शिवजयंतीचे तरुणांना एकसंघ ठेवण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज शिवजयंती निमित्त मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा उत्सव मंडपात विराजमान करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रथमेश इंगळे यांनी शिवरायांची आरती केली. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. या प्रसंगी उत्सव समितीच्या वतीने नगरसेवक तथा संस्थापक तम्मा शेळके व उत्सव उपाध्यक्ष राजू मद्रीकर
यांनी प्रथमेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या प्रसंगी शिवजयंती उत्सव उपाध्यक्ष राजू मद्रीकर, रुद्रा पाटोळे, संस्था सचिव अतुल जाधव, सुहास सुरवसे, बांधकाम अभियंता वरुण शेळके, मनोज गंगणे, प्रविण डोके, शंकर माळी, स्वामीराव लोणारी, स्वामीनाथ बेद्रे, बंडू इंगळे, अप्पू किणगी, रमेश शंभेवाड, अनिल सोनटक्के, वैजूनाथ मुकडे,
इरण्णा गवंडी, परमेश्वर शिंदे, संघटक प्रशांत धोत्रे, ओंकार जाधव, सोनू सुरवसे, समर्थ जामदार, सुरज जाधव, अमोल कोरे, रवी कोरे, प्रज्वल पाटोळे, बंटी फुटाणे, स्वरूप जाधव, सतिश जगताप, राहुल कोरे, किशोर खरात, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, सुनिल पवार, आदीत्य गवंडी, श्रीशैल गवंडी, राहूल गवंडी, राकेश गवंडी, बंटी नारायणकर, स्वामी सराटे, स्वामीनाथ चव्हाण, रमेश शिंदे सर व नागरीक तथा अन्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – प्रथमेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करताना नगरसेवक तथा संस्थापक तम्मा शेळके
व उत्सव उपाध्यक्ष राजू मद्रीकर, अतुल जाधव व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button