गावगाथा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या सेवेत महेश इंगळे यांचे योगदान मोलाचे – मा.आमदार दिलीप माने

श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर दिलीप माने यांचे मनोगत.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या सेवेत महेश इंगळे यांचे योगदान मोलाचे – मा.आमदार दिलीप माने
श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर दिलीप माने यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.१९/०२/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प्रमुख तथा भारतीय जनता पार्टीचे शहराताल सर्वात अनुभवी नगरसेवक महेश इंगळे यांच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या सेवेत मोलाचे योगदान असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे नेते तथा सोलापूर जिल्ह्यातील माने सहकार क्षेत्राचे सर्वेसर्वा व एसपीएम तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रमुख, मा.आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले.
आज दिलीप माने यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास श्री स्वामी समर्थांच्या दर्शना प्रित्यर्थ भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्याकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याचा आढावा ऐकून घेतला. या प्रसंगी दिलीप माने यांच्यासह दिलीप माने यांचे सुपूत्र, तथा जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य पृथ्वीराज माने, शिक्षक नेते दरेकर सर यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी दिलीप माने बोलत होते. पुढे बोलताना दिलीप माने यांनी श्री स्वामी समर्थांचे हे देवस्थान सर्व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महेश इंगळे हे सर्व स्वामी भक्तांच्या सुविधांना प्राधान्य देत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून समाधान वाटले असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त व दिलीप माने साहेब समर्थक उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दिलीप माने, पृथ्वीराज माने, दरेकर सर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button