गावगाथा

श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबीर

श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे रक्तदान शिबिर संपन्न
अक्कलकोट : प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष मा. श्री. मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे आयएमसीचे चेअरमन मा. श्री.राजशेखर हिप्परगी साहेब होते आणि सदर शिबिरात संस्थेचे आयएमसी सदस्य मा. श्री.कमलाकर सोनकांबळे हे उपस्थित होते सदर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान याचे महत्त्व सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर श्री. अजय इंगळे सर श्री. बनाळे सर यांनी पटवून दिले व प्रशिक्षणार्थ्यांना महत्त्व समजावून सांगितले. सदर शिबिरा करिता सूत्रसंचालन श्री मंठाळे सर यांनी केले सदर रक्तदान शिबिर करिता संस्थेचे प्राचार्य श्री प्रदीप हरिदास साहेब यांचे मार्गदर्शन लाभले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे जेष्ठ निदेशक श्री नदाफ सर,श्री.बोगाळे सर,श्री. बगले सर,श्री वाघमारे सर,सौ गवल मॅडम, श्री बिराजदार सर,श्री कोणापुरे सर, श्री स्वामी सर,श्री सोन्नद सर,श्री खंदारे सर, श्री.माडीकर या सर्वांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button