विद्यार्थी व शिक्षकांच्या एकोप्याने कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात.
(श्रीशैल गवंडी, दि.१९/०२/२६.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत मैंदर्गी रोडवरील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये संस्थेचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांच्या एकोप्याने कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये शिवजयंती निमीत्त आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे प्रा.नागनाथ जेऊरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी प्रा.नागनाथ जेऊरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवरायांचे जीवन कार्य सांगीतले. छत्रपती शिवरायांचे आदर्श बाळगून विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे असे आवाहन ही प्राचार्य नागनाथ जीवरे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. यावेळी विजयकुमार पवार सर, उमेश सोनवणे, रवींद्र नष्टे, चित्तरंजन अगरथडे, सचिन घाटगे,
बंटी नारायणकर आदींसह अन्य ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन प्रसंगी प्रा.नागनाथ जेऊरे, बंटी नारायणकर व अन्य उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!