श्री राम जय जय राम…।! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री राम जन्मोउतसव सोहळा संपन्न
लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

श्री राम जय जय राम…।!
च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री राम जन्मोउतसव सोहळा गुरुवारी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वंभर पुजारी आणि सोमनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी नंतर श्रींचा जन्मो उतसव दिनानिमित्त गुलाल व पाळणा कार्यक्रम शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

त्यानंतर संकल्प व नैवेद्य आरती सोडण्यात आला.

याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता विकास पाटील व मंडळाचे सचिव शामराव मोरे, , अभियंता अमित थोरात, पिंटू साठे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ,महादेव अनगले, सतिश महिंद्रकर, गोरखनाथ माळी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, कलयाण देशमुख,महांतेष सवामी,समर्थ घाडगे, देवराज हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, , राजू पवार, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
