गावगाथा

अनंत चैतन्य प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्योत्सव उत्साहात साजरा-

दिनविशेष

अनंत चैतन्य प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्योत्सव उत्साहात साजरा- —————————————-
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित,
अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व सेमी इंग्रजी विद्यालय हन्नूर येथे आज ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी हन्नूर गावचे प्रतिष्ठित नागरीक श्री. कल्लप्पा विभुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांस सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हन्नूर गावचे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी हे होते.या कार्यक्रमाची सुरूवात कु. रेणुका हेगडे,कोमल चव्हाण,श्रद्धा इरवाडकर,शिवानी बाळशंकर यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली.याचवेळी कु. स्वरुपा पुजारी,आरती पुजारी,वैदेही घोडके,श्रृती घोडके,रोहिणी घोडके यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.यानंतर दहावी व बारावीत विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळवलेल्या व प्रथम ,द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या व इ. ५ वी ते ९ वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या रोख बक्षीसांने गौरव करण्यात आले.यावेळी कु.श्रद्धा जळकोटे ( इ. १० वी) या विद्यार्थिनीचे हरवलेले सोन्याचे अंदाजे १००००/- रु. किंमतीचे कानातील फुल प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल कु. वैष्णवी स्वामीनाथ भरमशेट्टी ( इ. ७ वी ) हिचे यावेळी ५०१/- रु. चे रोख बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थिनी कु. अंकिता किरनाळीकर, शिवानी बाळशंकर, दिव्यांनी निकम यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले.तर अंबिका जळकोटे हिने देशभक्तीपर कविता सादर केली.तर सेमी इंग्रजी विद्यालयाच्या भिमाशंकर घोडके, सृष्टी हेगडे,भाविका चव्हाण,पियुष चव्हाण या चिमुकल्यांचीही खुप छान भाषणे झाली.तर एल. के. जी. व पहिली, दुसरी, तिसरीच्या मुलां- मुलांनी सुंदर नृत्य सादर केले.यावेळी हन्नूर च्या सरपंच सौ. सोनालीताई तळवार, उपसरपंच मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री.चंद्रकांत थोरात, प्रतिष्ठित नागरीक, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी, सशस्त्र सीमा सुरक्षा बल हन्नूर चे जवान, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी,जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राठोड गुरुजी व त्यांचा संपूर्ण शिक्षक स्टाफ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे,पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग, सेमी विभाग शिक्षक-शिक्षकेत्तर स्टाफ व जि. प.,सेमी व प्रशालेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अप्पासाहेब काळे सर, सुत्रसंचालन सौ. मल्लम्मा चपळगाव मॅडम यांनी केले तर आभार सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी मानले.खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आज अत्यंत नियोजनबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने साजरा केलेल्या प्रशालेतील ” स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ” संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ.शांभवीताई कल्याणशेट्टी,संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती,सी.ई.ओ.सौ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button