गावगाथा

*तोळणूर श्री.सिद्धरामेश्वर प्रशालेच्या अमोल पाटील बोरोटी केंद्रातून प्रथम*

*प्रशालेच्या दहावीचा निकाल 98 %*

*तोळणूर श्री.सिद्धरामेश्वर प्रशालेच्या अमोल पाटील बोरोटी केंद्रातून प्रथम*

HTML img Tag Simply Easy Learning    

*प्रशालेच्या दहावीचा निकाल 98 %*
*अक्कलकोट:-*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेत तोळणूर येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट संचलित श्री सिद्धरामेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तोळणूरचे विद्यार्थी अमोल राजशेखर पाटील 95% गुण प्राप्त करून बोरोटी केंद्रात आणि शाळेत प्रथम क्रमांक येण्याच्या मान मिळविला असून प्रशालेत द्वितीय क्रमांक संगणप्पा धानप्पा उपासे 86.40 % तर अश्विनी रमेश व्हरकेरी 86 % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे .
परीक्षेसाठी एकूण 50 विद्यार्थी बसले होते .शाळेच्या एकूण निकाल 98 % इतका लागला आहे . प्रशालेने मागील यशाची परंपरा कायम राखले असून प्रशालेचा विद्यार्थी पाटील अमोल राजशेखर 95% टक्के गुण प्राप्त करून बोरोटी केंद्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला तसेच कुमारी -पल्लवी बसवराज सिन्नुर हिने 85.60% टक्के गुण बोरोटी केंद्रातून आणि प्रशालेत कन्नड माध्यमातुन द्वितीय क्रमांक आणि कुमारी-संजना सुरेश कुरले हिने 84.80% घेऊन बोरोटी केंद्रातून आणि प्रशालेत कन्नड माध्यमातुन तृतीय क्रमांक येण्याचा मान प्राप्त केली आहे.
प्रशालेतून मराठी माध्यमातून संगणप्पा धानप्पा उपासे ८६.४० % (प्रथम क्रमांक) अश्विनी रमेश व्हरकेरी ८६ %(द्वितीय क्रमांक)
कुमारी – काशीबाई अनिल कुसगल 78.60% घेऊन प्रशालेत (तृतीय क्रमांक) प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रकाश अतनुरे,काशिनाथ चलगेरी,हमीद नदाफ
मुख्याध्यापक सुशीलकुमार गायकवाड,नसिरपाशा पिरजादे, जगदेवी माणकोजी,विठ्ठल पवार,कांचन पवार इतर सर्व सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या
संस्थेचे अध्यक्ष राजीव माने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, तानाजी चव्हाण, बाळासाहेब मोरे , सुधाकर गोड्याल, अमर शिंदे, शालेय समिती चेअरमन विक्रांत गोडसे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश व्हरकेरी, उपाध्यक्ष शामराव पाटील यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिले आहे .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button