गौरी गंगाजळीवाले यांच्या भक्तीसंगीताने रंगला वटवृक्ष मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सव.
भक्ती संगीतसेवा प्रारंभी महेश इंगळे यांच्या हस्ते गायिका गौरी गंगाजळीवाले व सहकलाकारांचा सन्मान.
(श्रीशैल गवंडी, दि.१९/०४/२०२५.अ.कोट)
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतीथी उत्सवातील धर्मसंकीर्तन महोत्सवात तिसऱ्या पुष्पातील द्वितीय सत्रात पुण्यातील गायक गौरी गंगाजळीवाले व सहकलाकार यांची भक्तीसंगीत गायनसेवा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गौरी गंगाजळीवाले यांनी राग यमन मधील ओंकार स्वरूपा ही गुरू महिमा सांगणारी बंदिश सादर केली.
त्यानंतर ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, आज मी दत्त गुरू पाहिले, निघालो घेऊन दत्ताची पालखी, अक्कलकोट स्वामींची पालखी, स्वामी समर्था माझी आई, स्वामी राहो
मजवरी कृपा, समर्था तुम्ही माझे माय बाप, सदैव तुमच्या चरणी माझा, देवा बोलवा हो माझ्याशी, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, कानडा राजा पंढरीचा, नाम स्वामींचे येता माझ्या ठाई रे, देह रंगे रंगूनी जावा इत्यादी भावगीत, भक्तीगीते सादर करुन उपस्थित श्रोत्यांना भक्तीगीत मेजवानीची लयलुट केली. या भक्ती संगीताने धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या ६ व्या पुष्पातील दुसऱ्या सत्रात आपल्या सुमधूर वाणीने भक्ती गायनाने भक्तीचे आध्याय रंगवित श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली सेवा समर्पण केली. या गायन व भक्ती संगीत सेवेत
गायिका गौरी गंगाजळीवाले यांना
हार्मोनियमवर मयुर स्वामी, तबल्यावर महेश स्वामी,टाळवर आदित्य जोशी यांनी साथ उत्कृष्ट संगत केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी गौरी गंगाजळीवाले, सुचिता गंगाजळीवाले, गिरीश गंगाजळीवाले व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे निवेदन धनश्री बावीकर यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे
गौरी गंगाजळीवाले यांच्या आई सुचिता गंगाजळीवाले, वडील गिरीश गंगाजळीवाले
मंदीरचेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ओंकार पाठक, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, शिवपुत्र हळगोदे, सुनिल कटारे, मनोज इंगुले, श्रीशैल गवंडी, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, बंडोपंत घाटगे, आदीत्य गवंडी, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, अभिषेक गवंडी, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, अविनाश क्षीरसागर, चंद्रकांत गवंडी, गिरीश पवार, सचिन हन्नूरे, लखन सुरवसे, सिध्दार्थ थंब, विजयकुमार कडगंची, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, खाजप्पा झंपले, महेश मस्कले, संतोष पराणे, प्रसाद सोनार, संतोष जमगे, महादेव तेली यांच्यासह राज्याच्या कानाकोपरयातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित राहून या भक्ती संगीत श्रवण सेवेचा लाभ घेतला.
फोटो ओळ – भक्ती संगीत कार्यक्रम सादर करताना गायिका गौरी गंगाजळीवाले व अन्य वादक दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!