गावगाथा

मतदान जनजागृती बाबत स्वीपचे कार्य कौतुकास्पद – सदाशिव पडदुणे

मतदान जागृती

मतदान जनजागृती बाबत स्वीपचे कार्य कौतुकास्पद
– सदाशिव पडदुणे..

सोलापूर प्रतिनिधी – ” SVEEP उपक्रमांचा उद्देश मतदारांना नैतिक मतदानाबाबत उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा जसे की मतदान कसे करावे, निवडणुकीदरम्यान होणाऱ्या भ्रष्ट व्यवहारांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कशी मदत करावी इत्यादी माहिती देणे आहे. सर्वसामान्य मतदारांच्या जागृतीसाठी SVEEP उपक्रम महत्वाचे आहेत.सर्वच मतदार संघात मतदान जनजागृती बाबत स्वीपचे कार्य कौतुकास्पद,सोलापूर शहर मध्य परिसरातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.”असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (सोलापूर क्र. १ ) सदाशिव पडदुणे यांनी केले. ते २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या स्वीपच्या कार्यासंबंधीच्या बैठकीत आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
२४९ शहर मध्यसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले काम नियमि करून जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत पथनाट्य, वेगवेगळ्या आस्थापनांना भेटी देणे, रिक्षाच्या माध्यमातून प्रबोधन, विद्यार्थी संवाद, पालक संवाद आणि मतदारांशी संवाद साधून स्वीप अंतर्गत
उत्तम काम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.चला मतदान करूया, उज्वल भविष्य घडवूया.मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अशा वेगवेगळ्या घोषणा याच्या माध्यमातून मतदार जनजागृती चे काम सुरू आहे.यावेळी मतदार जनजागृतीच्या फलकाचे अनावरण केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर बंडगर,अविनाश गोडसे, प्रमुख भरारी पथक दत्तात्रय गायकवाड, विद्या जाधव, संतोष माने, बळवंत नरोटे, दर्याप्पा कुंभा,र समीना शेख,अब्दुल कुरेशी, मैना घुमरे, सागर स्वामी, सुरेश बामणे, सुनील मुंडे, संतोष पवार, सुनील जाधव, अश्विनी माने आदी उपस्थित होते.

फोटो ओळी – मतदार जनजागृतीच्या फलकाचे अनावरण करताना निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव, अविनाश गोडसे, प्रमुख भरारी पथक दत्तात्रय गायकवाड, संतोष पवार, सुनील जाधव आदी

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट—-
SVEEP हा भारतातील निवडणूक आयोगाचा मतदार शिक्षण, मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी प्रमुख कार्यक्रम आहे. हा एक बहु-हस्तक्षेप कार्यक्रम आहे जो नागरिक, मतदार आणि मतदारांना निवडणूक प्रक्रियेबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या माहितीपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध माध्यम आणि माध्यमांद्वारे पोहोचतो. SVEEP ची रचना राज्याच्या सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल तसेच निवडणुकीच्या मागील फेऱ्यांमधील निवडणूक सहभागाच्या इतिहासानुसार केली आहे. आयोग अनेक मतदार जागृती साहित्य तयार करतो आणि संवादाच्या विविध माध्यमे/प्लॅटफॉर्मद्वारे जसे की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया इत्यादींद्वारे त्याचा प्रसार करतो.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button