गावगाथा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

युध्द सदृष्य परिस्थितीनंतर आज बुद्ध पौर्णिमेरोजी पुन्हा भाविकांची स्वामी दर्शनाकरिता गर्दी.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

युध्द सदृष्य परिस्थितीनंतर आज बुद्ध पौर्णिमेरोजी पुन्हा भाविकांची स्वामी दर्शनाकरिता गर्दी.

(अ.कोट,श्रीशैल गवंडी,दि.१२/०२/२०२५) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर म्हणजे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. आज पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती नैवेद्य आरती संपन्न झाली. पहाटेपासूनच सर्व पुरुष व महिला भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. आषाढी, चैत्री, कार्तिकी, माघी वारीला जसे वारकरी पंढरपूरची वारी करतात तसे येथील श्री स्वामी समर्थांचे भक्त दर पौर्णिमेला अक्कलकोटची वारी करीत आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या भक्त संख्येत कमालीची घनता दिसून येत आहे. येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शना प्रित्यर्थ मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन वारंवार विविध उपाय योजना राबविण्यात व्यस्त आहेत. त्याचेच एक भाग म्हणून आता गेल्या काही दिवसांपासून
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पुरुष व महिला स्वामी भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात येत आहे. या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांचे स्वामी दर्शन सुलभ होऊन भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. यासोबतच वयोवृद्ध व विकलांग भाविकांना व्हीलचेअरची सोय असून स्वतंत्र दर्शन व्यवस्थेच्या रांगेतून स्वामी दर्शनास सोडण्यात येत आहे, त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने आहे त्या परिसरातच आता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अमलात आणले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याप्रसंगी काही भाविकांनी मनोगत व्यक्त करताना पुरुष व महिला स्वामी भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात येत असल्याने धक्काबुक्की व चेंगराचेंगरीतून मुक्ती मिळून शांतचित्ताने व प्रसन्न वातावरणात स्वामी समर्थांचे दर्शन होत असल्याबद्दल मंदिर समितीचे आभार मानले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, ऋषिकेश लोणारी आदींसह मंदिर समितीचे कर्मचारी सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून सर्व स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनासाठी परिश्रम घेतले.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पुरुष व महिला भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनास सोडण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button