गावगाथा
गौतम बुद्धाची शिकवण आचरणात आणावी मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन कार्यक्रम

गौतम बुद्धाची शिकवण आचरणात आणावी मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट :
भगवान गौतम बुद्धांनी अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य या तत्वांची शिकवण दिली त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होण्यास मदत झाली. त्यांनी दिलेली मानवतेची शिकवण जगाच्या उन्नतीसाठी महत्त्वाची असल्यामुळे ती आचरणात आणली पाहिजे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन कडून आयोजित केलेल्या बुद्ध पौर्णिमा निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंबणप्पा भंगे, मलकप्पा भरमशेट्टी, कॉमर्स असोसिएशन प्रमुख प्रा शिल्पा धुमशेट्टी, प्रा शितल फुटाणे, प्रा जनाबाई चौधरी, शरणय्या मसुती, रवींद्र कालीबत्ते आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. राजपुत्र अवस्थेचा त्याग करून जनतेसाठी संन्यासी जीवन स्वीकारले, चांगले कर्म करा, आचरण शुद्ध ठेवा, नेहमी सत्य बोला, शांततेचा मार्ग स्वीकारा, इतरांना मदत करा अशी शिकवण त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी केले, आभार शिल्पा धूमशेट्टी यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
गौतम बुद्धांच्या जीवनातील अपूर्व योग
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण या तिन्ही घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्या त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या जीवनात हा अपूर्व योग आला असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
युद्ध नको बुद्ध हवा
मानवाने जीवनात शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे असा संदेश भगवान गौतम बुद्धांनी दिला. परंतु आज युद्धाचा मार्ग अवलंबला जात आहे ही घटना मानवतेला विनाशाकडे घेऊन जात आहे. त्यामुळे युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणण्याची वेळ आली आहे असे ही मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेस अभिवादन करतात मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर