गावगाथा

स्व.रजनी मंगाणे यांच्या स्मरणार्थ कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे येथे रक्षाबंधनानिमित्त हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम

युवा उद्योजक प्रकाश मंगाणे यांच्या अनोखं उपक्रम

स्व.रजनी मंगाणे यांच्या स्मरणार्थ कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे येथे रक्षाबंधनानिमित्त हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम

पुणे : कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त एक आगळावेगळा आणि हृदयाला भिडणारा सामाजिक उपक्रम पार पडला. हा उपक्रम आयोजक प्रकाश मंगाणे यांची स्वर्गीय रजनी मंगाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबविण्यात आला.

या कार्यक्रमात आयोजकाच्या माध्यमातून निराधार व अनाथ १०० मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचा उजेड त्यांच्या भविष्यात नवा आत्मविश्वास निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. “जशी राखी बंधनाची गाठ संरक्षण, प्रेम आणि आपुलकीचे वचन देते, तशीच ही मदत या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार ठरेल,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात भारतीय माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या देशसेवेतील त्याग, शौर्य आणि देशभक्तीला मनःपूर्वक सलाम करण्यात आला. देशासाठी प्राणपणाने लढलेल्या या वीरांचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

आयोजकांनी भावनिक शब्दांत सांगितले, “असा एकही दिवस नाही की माझ्या बहिणीची आठवण येत नाही. या लहानग्या मुलींमध्ये तिचा चेहरा मला दिसला आणि डोळे पाणावले. मन भरून आलं.”

राखीचा सण, शिक्षणाचा उजेड आणि देशसेवेचा गौरव — या तिन्ही मूल्यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनावर अमिट ठसा उमटवून गेला. येत्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत असेच उपक्रम राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button