गावगाथा

मुंबई निवासी अक्कलकोटकरांचा स्नेह मेळावा उत्साहाने संपन्न…

अस्सल सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेत गावाकडच्या आठवणीत अधिकारी,उद्योजक रमले.

मुंबई निवासी अक्कलकोटकरांचा स्नेह मेळावा उत्साहाने संपन्न…

HTML img Tag Simply Easy Learning    

अस्सल सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेत गावाकडच्या आठवणीत अधिकारी,उद्योजक रमले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

पनवेल — अक्क्लकोट तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात स्वतःच्या हिमंतीवर प्रामाणिकपणे काम करत विविध उद्योग, व्यवसाय करत असताना आपलं गांव तसेच आपल्या अक्कलकोट तालुक्याचा ओढ कायम असते. गावापासून दूर मायावी नगरी मुंबईतील अक्कलकोट तालुक्यातील आपली माणसं एकत्र यावे यासाठी मैंदर्गी गावचे सुपुत्र उच्च न्यायालयातील वकिल मा.विश्वनाथ पाटील यांनी मुंबईतील अक्कलकोट करांना व्हाॅटसप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले त्यानंतर सर्वजणाना घेऊन कार्यक्रम घेण्याचं ठरलं, नियोजन करण्यासाठी विविध मंडळींनी आपल्या परीने योगदान देत कार्यक्रमाचे नियोजन केले.याआधी दोन स्नेह मेळावा घेण्यात आली आहेत पहिला स्नेह मेळावा उड हाऊस जिमखाना साऊथ मुंबई व दुसरं स्नेह मेळावा हॉटेल वैशाली चेंबूर येथे घेण्यात आला आहे यंदाचा स्नेह मेळावा वर्षं तिसरं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    


पनवेल जवळ आपल्याच तालुक्यातील नरेश बिराजदार यांच्या निसर्ग रम्य परिसरात असलेल्या फार्म हाऊस वर कार्यक्रम घेण्याचं ठरले त्यासाठी हुरडा पार्टी व अस्सल सोलापूरी जेवणाचा बेत आखला
शेतकरी ते ग्राहक थेट अस्सल सोलापुरी हुरडा पार्टीत हुरडा , शेंगा चटणी, स्पेशल फरसाण, मका चिवडा, बारीक शेव,भरली मसाला वांगी, सेंद्रिय फळे,सेंद्रिय गुळ, थंडगार मठ्ठा,बेसन पिटला,पालक गरगट्टा, मिक्स भाजी, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी,हिरवी मिर्ची ठेसा, दही चटणी, शेंगा पोळी, धपाटे,दाळ,जिरा भात असा भरगच्च ग्रामीण जेवणाचा बेत काशिनाथ भतकुणकी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती.
सुरवातीला आलेल्या मान्यवरांनी छोटेखानी आपला परिचय दिला व सोबत गरमागरम हुरडा ताव मारत अनेकांनी कविता, मराठी, हिन्दी गाणी सादर केले, याच दरम्यान अनेक मान्यवरांनी आपल्या व्यवसाय उभा करताना आलेले अनुभव सांगितले यात सगळ्यांचा अनुभव हाच होता की मुंबईत प्रामाणिक व कष्टाने काम केलं तर मुंबई कुणाला ही निराश करत नाही.
यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ हे सदरील कार्यक्रमाला येणार होते परंतु, व्यस्त शासकीय कामामुळे येऊ शकले नाही म्हणून त्यांनी मोबाईल फोन द्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या व पुन्हा एकदा लवकरच भेटू असे आश्वासनही दिले.
जेवणं करत असताना गप्पागोष्टी करत विविध गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी खासदार संजय दिना पाटील, अ.नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कस्टमचे अति.आयुक्त मल्लिनाथ जेऊरे, जीएसटीचे अति.आयुक्त डॉ.रमेश भुमे, परिवहन उपायुक्त विद्यासागर हिरमुखे, पनवेल मनपाचे उपायुक्त गणेश शेटे, नवी मुंबई मनपाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, पालघर मनपाचे लेखाधिकारी धनराज पांडे, वीरशैव महासभेचे अध्यक्ष
ॲड.एस.एम.पाटील, मुंबई मनपाचे सहा.आयुक्त गजानन बेल्लाळे, सरकारी काॅन्ट्रॅक्टर राजेंद्र बिडवे इ. सन्माननीय पाहुण्यांनी ‘मुंबई निवासी अक्कलकोटकर’ च्या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सदरच्या स्नेह मेळाव्याला मुंबई परिसरातील कर्जत, खोपोली, पालघर पासून ते दक्षिण मुंबई पर्यन्तच्या परिसरात वास्तव्यास असलेले ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.अनेक उच्च पदस्थ शासकीय अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, उद्योगपती, नगरसेवक, बिल्डर, कॉंट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट, लेखक वगैरे मुंबई निवासी अक्कलकोटकर असे जवळपास नव्वद सदस्य आवर्जून या मेळाव्यास उपस्थित होते. विशेष म्हणजे या स्नेह मेळाव्यास पुण्याहून अनेक अक्कलकोटकर मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते. चंद्रशेखर नंदीकोल स्वामी यांनी पूजा करून केली. सुत्र संचालन आनंद गवी यांनी केले. सदरचा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी ‘मुंबई निवासी अक्कलकोटकर’ या ग्रुपचे सदस्य अँड.विश्वनाथ पाटील (उच्च न्यायालय), अँड अर्जुन पाटील (उच्च न्यायालय), आनंद गवी (रियल इस्टेट), नरेश बिराजदार (बिल्डर), सिद्धेश्वर जम्मा, (उद्योगपती), काशीनाथ सगुळमळे (उद्योगपती), सुनील पाटील (सचिव, अवजड वाहतूक सेना), सुमित फुलारी (छत्रपती प्रतिष्ठान) व इतर सर्व ग्रुप सदस्यांनी खूप मेहनत घेतली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group