मनापासून समरस होऊन कार्य करीत राहा यश तुमचेच आहे – शिवरत्न शेटे
द.सोलापुर,ता:२८ वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मनापासून समरस होऊन कार्य करीत राहा यश तुमचेच आहे
असा सल्ला शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी दिला.येथील स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे बारावी व दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी, कन्नड , मराठी व उर्दू माध्यमात प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या तसेच गावातील 80 टक्के पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 500 रुपये रोख,प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. माजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी ,शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या हस्ते सरपंच जगदीश अंटद, सेवानिवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, मुख्याध्यापक विरेश थंळगे ,पत्रकार दिनकर नारायणकर, संपादक धोंडप्पा नंदे यांच्या उपस्थितीत व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवशरण म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ संपन्न झाला.शिवराय ते भिमराय या प्रवासाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा असेही शिवरत्न शेटे यांनी सांगितले.आपल्या आई-वडिलांना आनंद होईल असे कार्य करीत राहावे, आधुनिक काळामध्ये अभ्यासासाठी अमर्यादित साधने उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या असा सल्ला डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक व स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सचिव सिद्धारूढ काळे यांनी स्वागत केले तर कार्याध्यक्ष माजी सरपंच महादेव होटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!