जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या राष्ट्रपिता गांधीजींची तत्त्वे जोपासली पाहिजेत : सुधीर सोनकवडे
वागदरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या राष्ट्रपिता गांधीजींची तत्त्वे जोपासली पाहिजेत : सुधीर सोनकवडे
वागदरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
वागदरी — स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय वागदरी तालुका अक्कलकोट येथे आज 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.याप्रसंगी सुधीर सोनकवडे यांनी महात्मा गांधीच्या बद्दल बोलताना म्हणाले दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा,सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यावेळी वागदरीचे नूतन सरपंच शिवानंद घोळसगाव माजी सरपंच रविकिरण वरनाळे, कोटेपा कोठे ,श्रीकांत सोनकवडे, परमेश्वर पंचाक्षरी, सिद्धाराम सरसंबी, परमेश्वर सोनकवडे, चैतन्य वरनाळे, ग्रंथालय कर्मचारी सुरेश छुरे संस्थेचे अध्यक्ष सुधीर सोनकवडे सिद्धाराम कोळी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते