*आषाढी यात्रा पंढरपूर यात्रेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चालक वाहकांचा गौरव.*
आषाढी पंढरपूर यात्रा २०२५ मध्ये राज्य परिवहन मंगळवेढा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी ज्यादा वाहतूक करून प्रवाशांची सेवा केली. यामध्ये चालक वाहक यांचे योगदान महत्वाचे होते. मंगळवेढा आगाराने मंगळवेढा ते गोपाळपूर अशा २८० फेऱ्या केल्या. यामध्ये जास्तीत जास्त फेऱ्या करून जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव व सन्मान आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भविष्यात अशाच प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाची सेवा करून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करावी व राज्य परिवहन महामंडळाची भरभराट करावी असे आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी उपस्थित चालक वाहकांना आवाहन केले. यावेळी वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रावसाहेब चव्हाण, वरिष्ठ लिपिक धनाजी पाटील, अमोल काळे, वाहक अमोल बड्डे, अंकित माळी, अनिकेत माळी, अमोल शिनगारे, गणेश गवळी, चालक मनोहर दावणे, नंदकुमार भोसले, गोविंद पोले, सचिन मोहिते हे उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!