गावगाथा
वागदरीत विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप; प्रकाश मंगाणे यांचा स्तुत्य उपक्रम
वागदरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

वागदरीत विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप; प्रकाश मंगाणे यांचा स्तुत्य उपक्रम
वागदरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
वागदरी (ता. अक्कलकोट) – येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत वागदरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक प्रकाश मंगाणे यांच्या सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच मा. शिवानंद घोळसगाव होते.

कार्यक्रमाला वीरभद्र मंगाणे, सुनील सावंत, रमेश मंगाणे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष शरण माशाळे, सौ. रेखा मंगाणे, अजली मंगाणे, नागेश स्वामी, शरण सुरवसे, बसवराज उंबराणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश मंगाणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “गावाच्या मुळाशी असलेली ही शाळा म्हणजे आपली शैक्षणिक शिदोरी घडवणारे स्थान आहे. इथल्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही छोट्याशा स्वरूपातील मदत देण्यात आली आहे. भविष्यातही समाजोपयोगी कार्य करण्याची मनोमन तयारी आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरण सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन बसवराज उंबराणे यांनी केले.
