कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात गुरुवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी..
अक्कलकोट :
सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी सप्तऋषी ची महती सांगून,जीवनामध्ये गुरूंचे महत्त्व काय याविषयी बोलताना गुरुशिवाय मोक्ष नाही, गुरुशिवाय दिशा नाही, ईश्वर प्राप्तीसाठी गुरूंची आवश्यकता आहे, गुरूंचा आदर सन्मान ठेवावा , प्रत्येकाने गुरूंच्या सानिध्यात राहून जीवन व्यतीत करावे असे ते म्हणाले.
यावेळी कु.कोमल कोरे, कु कावेरी गवंडी, कु साक्षी चौगुले, कु आलिया वळसंकर, कु श्रद्धा बाबर व कु सृष्टी चव्हाण या विद्यार्थीनीनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केले, कु सिद्धी बाबर, कु सुरेखा सोलनकर, कु पल्लवी सोलनकर, कु साक्षी केंगारे, कु ऐश्वर्या बिराजदार, कु रूपा ऐवळे व कु वैष्णवी पाटील या मुलीनी समुहगीत सादर केले. तर कन्नड माध्यमचे उमेश पाटील, सिद्धाराम मणे, आकाश हनमशेट्टी या मुलानी गुरुवंदन नृत्य सादर केले.
सुत्रसंचालन विद्यार्थीनी कु.प्रीती फुलारी हीने केली, प्रास्ताविक कु स्नेहा देडे हीने तर उपस्थितांचे आभार कु. दानेश्वरी बगले हीने मानले.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, श्रीदेवी मायनाळे, रविकिरण दंतकाळे, बाबूशा मंगरुळे, सिद्रामप्पा पाटील, कुमार जाधव, राजकुमार गवळी, कल्पना स्वामी, दीपक गंगोंडा, मनीषा दूधभाते, सागर मठदेवरु, निशिगंधा कोळी.आरती थोरात, विद्या बिराजदार, विद्याश्री वाले आदी शिक्षक उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!