गावगाथा

श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी

गुरु पौर्णिमा विशेष

📰 श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी 🎉
🗓️ दि. 10 डिसेंबर 2025पंच जगद्गुरु शिवाचार्य महास्वामीजी अड्ड पालखी सोहळा व दोन दिवसीय उत्सव

HTML img Tag Simply Easy Learning    

सोनपेठ (प्रतिनिधी): श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

🌄 सकाळी संजिवनी समाधीस रुद्राभिषेक, भजन, परमरहस्य पारायण, तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले.
🔱 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.
💐 श्रीमती कलावती (अपर्णा पोपडे) यांनी सिंहासन अर्पण केले.
🗣️ प्रास्ताविक चिल्लरगे गुरुजी यांनी रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह दिनांक ५ ते १२ डिसेंबरदरम्यान आयोजल्याचे सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

🎊 विशेष आकर्षण
📿 दि. १० डिसेंबर: पंच जगद्गुरु शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्ड पालखी सोहळा
🙏 दि. ११ डिसेंबर: मंडपपूजा व महास्वामीजींचे आशिर्वचन
🔚 दि. १२ डिसेंबर: अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता

HTML img Tag Simply Easy Learning    

🌿 रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त कर्नाटकमधील कोरवार, जि. विजापूर येथे श्रावण तपोनुष्ठान सोहळा ३ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५ दरम्यान संपन्न होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

🎂 दि. २० जुलै २०२५: श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा सुवर्ण महोत्सव (५० वा वाढदिवस) मठ संस्थान, सोनपेठ येथे साजरा होणार आहे.

🌟 कळंब येथील श्री मन्मथ स्वामी मंदिर कलशारोहण महोत्सव दि. १८ ते २१ जुलै २०२५ दरम्यान होणार असून, भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

🩸 रक्तदान शिबीर यशस्वी
माजलगाव ब्लड सेंटरचे डॉ. नवनाथ डापकर, डॉ. राहुल नागरगोजे, पोर्णिमा आंधळे, संध्या राजपूत व सायली स्वामी यांचा श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

🙏 विशेषतः महाराजांनी स्वतः रक्तदान करून समाजाला प्रेरणा दिली.
🎖️ रक्तदात्यांना सुभाषआप्पा नित्रुडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

🍛 महाप्रसादाचे आयोजन
अष्टुरकर परिवार, पेठशिवनीकर यांच्या वतीने सर्व भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला.

🎤 उमेश आप्पा नित्रुडकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थितीत विनोद चिमनगुंडे, संपादक किरण स्वामी, ओमप्रकाश शास्त्री, रतिकांत स्वामी, नागेश शास्त्री, शिवकुमार शास्त्री, प्रा. सिद्धार्थ व अंजली सोनाळे, व अनेक शिष्य मंडळींचा समावेश होता.

🔔 चिल्लरगे गुरुजींनी सर्व भक्तांना तन, मन, धनाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button