*⭕जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांचा फत्तेसिंह संस्थेकडुन होणार सन्मान..*
*⭕रविवारी भव्य नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ..*
======================
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था,अक्कलकोट व सकल मराठा समाज,अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.*
अक्कलकोटच्या इतिहासात अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव आता सातासमुद्रापलीकडे पोहोचले असून, अलीकडेच त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही बाब अक्कलकोटकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून, यामुळेच जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येत्या रविवारी १३ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शरदराव फुटाणे हे राहणार आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे, संचालक बाळासाहेब मोरे, राजीव माने, तानाजी चव्हाण, सुधाकर गोंडाळ, संतोष फुटाणे-जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी यावेळी केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!