रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने सामाजिक भान ठेवून अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा — आमदार सचिन कल्याणशेट्टी
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५७४ रक्तदात्यांनी दिले रक्तदान

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५७४ रक्तदात्यांनी दिले रक्तदान

अक्कलकोट, दि. २२ : रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने सामाजिक भान ठेवून अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा — आमदार सचिन कल्याणशेट्टी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार राज्यभर एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार अक्कलकोट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ५७४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी भारतमाता आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “रक्तदान ही अत्यंत मानवतेची आणि जीव वाचवणारी कृती आहे. भाजपचे कार्यकर्ते समाजसेवेत सदैव अग्रेसर आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे.”

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये मिलन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सागर कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, सुदर्शन यादव, विकास वाघमारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, अमोल हिप्परगी, प्रभाकर मजगे, शिवशरण जोजन, शिवशरण वाले, मल्लिनाथ स्वामी, प्रवीण शहा, संजय भागानगरे, सुनील गवंडी, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, आनंद तानवडे, परमेश्वर यादवाड, गिरमल गंगोंडा, सभापती अप्पू परमशेट्टी, आणप्पा बाराचारी, सुरेश नागुर, आप्पासाहेब बिराजदार, शंकर भांजी, महेश पाटील, राजेंद्र बंदीछोडे, सुरेश गड्डी, रामचंद्र अरवत, सुनील सिद्धे, बसवराज हौदे, स्वामींनाथ हिप्परगी, शिवलिंग स्वामी, जयशेखर पाटील, राजशेखर हिप्परगी, शिवराज स्वामी, नागराज कुंभार, शबाब कोरबू, कांतू धनशेट्टी, अविनाश मडीखांबे, उत्तम गायकवाड, नंनू कोरबू, यशवंत धोंगडे, अप्पू पराणे, रजाक सय्यद, सुनील दसले, अंकुश चौगुले, विक्रम शिंदे, श्रीकांत झिपरे, कल्याणी बिराजदार, दिनेश पटेल, चंद्रकांत दसले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामपंचायतीतील प्रतिनिधी, माजी नगरसेवक, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गोरक्षक दिना निमित्त २० गोरक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
📸 फोटो ओळ : अक्कलकोट येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार **सचिन कल