HTML img Tag
नेदरलँडच्या स्वामीभक्ताचा स्वामीदरबारात भावपूर्ण महाप्रसाद “इट्स व्हेरी नाईस अँड व्हेरी टेस्टी फूड” – जॉन ड्युंईंग यांची प्रतिक्रिया
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात नेदरलँड येथून अभ्यासदौऱ्यासाठी आलेले स्वामीभक्त जॉन ड्युंईंग यांनी भावपूर्ण वातावरणात महाप्रसादाचा आस्वाद घेत स्वामीचरणी नतमस्तक होत आपली आध्यात्मिक नाळ अधिक दृढ केली.
श्रावण महिन्यातील शनिवारी विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खीर, भाजी, आमटी, चपाती, भात व मठ्ठा यांचा समावेश असलेला प्रसाद ड्युंईंग यांनी आपल्या भारतीय सहकाऱ्यांसमवेत घेतला. त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त करत “भारतीय अन्नाची चव आमच्या देशातील पदार्थांपेक्षा खूपच वेगळी आणि चविष्ट आहे. स्वामी दरबारातील हा प्रसाद मी कधीही विसरणार नाही” अशी भावना व्यक्त केली.
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य पाहून ते भारावून गेले असून, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्यास त्यांनी मन:पूर्वक दाद दिली.
या वेळी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अभियंता गणेश पाटकर, जयश्री सोलंकी, अरुण सोलंकी, चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे, गणपती कोळी, रविकांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे यांच्या हस्ते जॉन ड्युंईंग यांचा कृपावस्त्र व स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!