*अक्कलकोटचे विक्रमवीर धानय्या कौटगी यांना पीएच.डी. प्रदान*
सोलापूर, दि.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यातर्फे के. एल. ई. मंगरूळे हायस्कूल, अक्कलकोट येथील शिक्षक प्रा. श्री. धानय्या गुरुलिंगय्या कौटगीमठ यांना “सुधा मूर्ती यांच्या साहित्यविश्वाचा अभ्यास” या विषयावरील संशोधनप्रबंधासाठी इंग्रजी साहित्यातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. संबंधित मौखिकी परीक्षा दिनांक २७ जुलै २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
या संशोधनप्रक्रियेसाठी दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. टी. एन. कोळेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. मौखिकी परीक्षेचे अध्यक्ष म्हणून डॉ. डी. सी. ननावरे तर बाह्य परीक्षक म्हणून डॉ. एम. खान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली.
परीक्षेच्या प्रारंभी डॉ. गणेश संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी संपूर्ण सहकार्य केले आणि आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी डॉ. शिवानंद तडवळ, प्रा. श्रीनिवास भंडारे आणि प्रा. रेवणसिद्ध हालोळी उपस्थित होते.
श्री. धानय्या सरांचे चिरंजीव कुमार रामेश्वर कौटगीमठ यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. संशोधनाच्या संपूर्ण प्रवासात डॉ. अमोगसिद्ध चेंडके सरांची अमूल्य साथ व प्रा. प्रकाश सुरवसे सरांचे खंबीर सहकार्य लाभले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!