अक्कलकोटच्या महिला डॉक्टर्स मंडळींचे विठ्ठल मंदिरात नामजप व नामस्मरण हा धार्मिक उपक्रम संपन्न

HTML img Tag
(श्रीशैल गवंडी, दि.२/८/२०२५.अ.कोट.)
शहरातील महिला डॉक्टर्स मंडळींच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या नामजप व नामस्मरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री.वटवृक्ष वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत ए.वन चौक येथील विठ्ठल मंदीरात मोठ्या उत्साहात व भक्ती भावात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली डॉक्टर्स मंडळींच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची व श्री विठ्ठलाची पुजा संपन्न झाली. यानंतर सर्व महीला डॉक्टर्स मंडळींच्या वतीने सामुहीक नामस्मरण व नामजपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शहरातील डॉ.मंजुषा मेंथे, डॉ.सहारा सलगरकर-मोमीन, डॉ.स्नेहा वेळापूरकर, डॉ.कोटी मॅडम, डॉ.सुरेखा मिठारी, डॉ.शैलजा माळी-चिंचोळी, डॉ.सुषमा शिवणगी, डॉ.मनिषा पाटील, डॉ.प्रिया पाटील आदी महिला डॉक्टर्स मंडळींनी सहभाग घेतला होता. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या सौजन्याने व मार्गदर्शनाने हा नाम जप व नामस्मरणाचा कार्यक्रम करण्याची येथे संधी देऊन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर्स मंडळींच्या वतीने डॉक्टर मंजुषा मेंथे यांनी मंदिर समितीचे व महेश इंगळे यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, आदित्य गवंडी, श्रीशैल गवंडी, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, संजय मोरे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – अक्कलकोटच्या महिला डॉक्टर्स मंडळींचे विठ्ठल मंदिरात नामजप व नामस्मरण कार्यक्रमाचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!