श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक व शैक्षणिक कार्य उल्लेखनीय – कुलगुरु डॉ.हेमलता बागल
श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महेश इंगळे यांच्या सत्कारा प्रित्यर्थ बोलताना कुलगुरु डॉ. हेमलता बागल यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, दि.२/८/२०२५.अ.कोट.)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती आपल्या विविध माध्यमातून लाभत असते. देवस्थानच्या या उपक्रमांनी देशभर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा अनुभव आपल्याला मुंबई व हैद्राबादमध्ये अनुभवता आले आहे. याच बरोबर देवस्थानने तत्कालीन चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांच्या कार्यांची दखल घेऊन तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती करुन तालुक्यातील एकमेव कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तथा ए.वन चौक येथील श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदीराच्या माध्यमातून तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. समितीचे प्रमुख महेश इंगळे हे पण तालुक्यातील विविध गावांमधील प्राथमिक व माध्यमिक प्रशालांकरीता शिक्षणाचे महत्व पटवून देऊन नेहमीच मदतीचा हात पुढे करतात. या सर्व घटनाक्रम लक्षात घेता
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक व शैक्षणिक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय असल्याचे मनोगत मुंबई येथील हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (HSNC) विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.हेमलता बागल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसचे दिग्दर्शक डॉ.व्ही.पी.धुळप यांच्या समवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रा.डॉ.हेमलता बागल व डॉ.व्ही.पी.धुळप यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी कुलगुरु डॉ.हेमलता बागल बोलत होत्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, डॉ.सुनील पवार, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, श्रीकांत झिपरे, विपूल जाधव, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – कुलगुरु डॉ.हेमलता बागल व डॉ.व्ही.पी.धुळप यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार करताना महेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!