वागदरी येथील जि.प.शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अक्कलकोट (प्रतिनिधी ) जि.प.प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनिषा कुणाळे होत्या तर लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी केले .विद्यार्थ्यानी दोन्ही समाजसुधारकांबद्दल माहिती सांगितली .लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महान सेनानी समाजसुधारक आणि राष्ट्रनायक होते .टिळक हे अत्यंत बुद्धिमान निर्भिड आणि दूरदृष्टी असलेले नेते होते .त्यांनी पुणे येथून केसरी आणि मराठा ही व्रूतपत्रे सुरू केली .या व्रुतपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीविरुध्द जोरदार तिका केली .”स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ” हे त्यांचे प्रसिध्द घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात स्फूर्ती निर्माण करते .टिळकांनी समाजसुधारणेसाठी मोठे कार्य केले त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे सार्वजनिक सण सुरू करून लोकांना एकत्र आणले आणि राष्ट्रीय एकता वाढवली .लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते लाल बाल पाल या त्रिमूर्तिमधील बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होत .असे माहिती देताना मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे म्हणाल्या . आण्णाभाऊ साठे समाजसुधारक लोककवी लेखक होते .साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे संघर्षाचा क्रांतीचा आवाज जागतिक प्रेरणेचे प्रतिक होते .महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या दलित श्रमिक कष्टकऱ्याच्या संवेदना लिखाणातून जागृत करणारे कवी लेखक साहित्यसम्राट लोकशाहीर थोर समाजसुधारक महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते आण्णाभाऊ साठे यांचे कार्य अतिशय मोलाचे व प्रेरणादायी आहे अशी माहिती रेखा सोनकवडे यांनी दिली .अशा थोर समाजसुधारकांना विनम्र अभिवादन .अनुसया कलशेट्टी यांनीही माहिती सांगितली व आभार व्यक्त केले .पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!